पाठांतर · संपूर्ण पाठ
1871 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 339–340 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 8 पायऱ्या · 3 मिनिटे
- दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं
- अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं
- वारीं वारीं जन्ममरणातें वारीं
- हारीं पडलों आतां संकट निवारीं
- जयदेवी जयदेवी महिषासुरमथनी
- सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी
- त्रिभुवनभवनीं पाहतां तुज ऐशी नाहीं
- चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं
- साही विवादीतां पडले प्रवाहीं
- ते तूं भक्तालागीं पावसि लवलाहीं
- प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
- क्लेशापासुन सोडीं तोडीं भवपाशा
- अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा
- नरहरि तल्लीन झाला पदपंकजकोशा