त्रिगुणात्मक त्रैमूर्ती

Recite · the whole text

Matches the 1910 print, p. 27–28. · Meanings: AI draft, editor review pending · 5 steps · 2 min

  1. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
  2. त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
  3. नेति नेति शब्दें नये अनुमाना
  4. सुरवरमुनिजनयोगिसमाधी नये ध्याना
  5. जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
  6. आरती ओंवाळितां हरली भवचिंता
  7. सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त
  8. अभाग्यासी कैंची कळे ही मात
  9. पराही परतली तेथें कैंचा हा हेत
  10. जन्ममरणाचाही पुरलासे अंत
  11. दत्त येऊनीयां उभा ठाकला
  12. साष्टांग नमनें प्रणिपात केला
  13. प्रसन्न होऊनि आशिर्वाद दीधला
  14. जन्ममरणाचा बा फेरा वांचविला
  15. दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान
  16. हारपलें मन झालें उन्मन
  17. मीतूंपणासी झाली बोळवण
  18. एका जनार्दनी श्रीदत्तध्यान