Recite · the whole text
Matches the 1914 print, p. 119. · Meanings: AI draft, editor review pending · 6 steps · 2 min
- शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदाम्
- शत्रुबुद्धिविनाशाय दीपोज्योतिर्नमोऽस्तु ते
- दीपो ज्योतिः परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः
- दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते
- दिव्या दिव्या दीपत्कार
- कानी कुंडल मोतीहार
- दिव्याला पाहून नमस्कार
- दिवा लावला देवापाशी
- उजेड पडला तुळशीपाशी
- माझा नमस्कार सर्व देवांपाशी
- तिळाचे तेल कापसाची वात
- दिवा तेवे मध्यानरात
- घरातली इडा-पीडा बाहेर जावो
- बाहेरची लक्ष्मी घरात येवो
- घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो