Recite · the whole text
Matches the 1871 print, p. 339–340. · Meanings: AI draft, editor review pending · 4 steps · 2 min
- दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं
- अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं
- वारीं वारीं जन्ममरणातें वारीं
- हारीं पडलों आतां संकट निवारीं
- जयदेवी जयदेवी महिषासुरमथनी
- सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी
- त्रिभुवनभवनीं पाहतां तुज ऐशी नाहीं
- चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं
- साही विवादीतां पडले प्रवाहीं
- ते तूं भक्तालागीं पावसि लवलाहीं
- प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
- क्लेशापासुन सोडीं तोडीं भवपाशा
- अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा
- नरहरि तल्लीन झाला पदपंकजकोशा